जुन्नर मध्ये भव्य पुष्प महोत्सवाचे आयोजन

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१३ ऑक्टोबर २०२२

जुन्नर


भारतात होणाऱ्या ९ पुष्प महोत्सवांच्या बरोबरीनेच १० वा शेवंतीच्या फुलांचा उत्सव सुरु होतो आहे, तो महाराष्ट्रातील सर्वोत्तम निसर्गरम्य अशा जुन्नर तालुक्यांतील निमदरी गावात..

 

अवधूत नर्सरी निमदरी व स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्था, जुन्नर आयोजित निसर्गांच्या सानिध्यात, डोगंराच्या कुशीत,पुण्यापासून ७० किमी अंतरावर तर ठाणे मुंबई पासून अवघ्या १५० किमी अंतरावर शिवनेरीच्या जवळ १०० पेक्षा जास्त शेवंतीच्या फुलांच्या जाती असलेल्या शेतात एक दिवस सुगंधी करायची सुवर्ण संधी म्हणजे शेवंती पुष्प महोत्सव दिनांक 16/10/2022 रोजी आयोजित करण्यात येत आहे.


शेवंतीच्या विविध रंगाच्या व 100+ जातीच्या ८ एकर शेवंतीच्या शेतांमध्ये व पॉलीहाऊस मध्ये येऊन शेवंतीच्या फुलांची तज्ञांकडून माहीती घेता येणार आहे. फुलांच्या रंगाने व गंधाने मोहुन जाण्याची आगळी वेगळी संधी व एक अविस्मरणीय अनुभव.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *