संजय राऊतांनी आईला लिहिलेल्या पत्रावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१३ ऑक्टोबर २०२२


खासदार संजय राऊत यांनी आपल्या आईला भावनिक पत्र लिहिलं आहे. संजय राऊतांनी पत्राच्या निमित्ताने अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. त्यांच्या या पत्रानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून सत्ताधाऱ्यांकडूनही उत्तर दिलं जात आहे. भाजपा नेते गिरीश महाजन यांनीदेखील संजय राऊतांच्या पत्रावर भाष्य केलं आहे.

गिरीश महाजन म्हणाले, त्यांनी पत्र लिहिलं पाहिजे, त्यात काही हरकत नाही. भेट घेण्याची मागणी केली तर त्यांना भेटताही येईल. त्यांची भेट झाली तरी काही हरकत नाही. त्यांच्या आईच्या प्रकृतीबद्दल मला फारशी माहिती नाही. पण त्या भेटायला जाऊ शकतात. पत्रात काय लिहावं हा त्यांचा प्रश्न आहे. सगळ्याच आरोपींच्या बाबतीत आपण हे पाहिलं आहे. तसंत त्यांनीही मत व्यक्त केलं असेल, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *