इंटरनेटवर अदृश्य गुन्हेगार विविध मार्गांनी फसवणूक करतात

पिंपरी प्रतिनिधी
१३ ऑक्टोबर २०२२


इंटरनेटच्या वापरकर्त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे . त्या तुलनेत सायबर गुन्हेगारांचीही संख्या वाढत आहे . इंटरनेटवर अदृश्य असलेले हे गुन्हेगार विविध मार्गांनी फसवणूक करतात . सणासुदीत ऑफर , सेल , डिस्काउंट , गिफ्ट , व्हाउचर एकावर एक फ्री ‘ अशा विविध मार्गांनी माहिती घेऊन फसवणूक होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे , असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे . गुन्ह्यांचा तपास करणे जिकरीचे सायबर क्राइममधील विविध किचकट गुन्ह्यांचा तपास म्हणजे अतिशय जिकरीचे आणि चिकाटीचे काम असते . ते सायबर पोलीस कौशल्याने करतात . पण ‘ माणूस आयुष्यातून उठू शकतो ‘ इतके गंभीर स्वरूप या गुन्ह्यांचे आहे . त्यामुळे इंटरनेट वापराच्या ज्ञानाबरोबरच जनजागृती आणि सतर्कता खूप महत्त्वाची आहे . इंटरनेट वापरकर्त्याचे थोडेसे दुर्लक्ष हे सायबर गुन्हेगारासाठी मोठी संधी असू शकते . त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.

दिवाळी धमाका , न्यू इयर धमाका , या प्रकारच्या लॉटरीमध्ये तुम्हाला ‘ ॲमेझॉन’वर बक्षीस लागले आहे असा फोन येतो . पत्र किंवा मेसेजही पाठवले जातात यात इलेक्ट्रॉनिक वस्तू , घरगुती वापराचे साहित्य किंवा चारचाकी वाहन तुम्हाला मिळणार आहे,असे सांगण्यात येते. फुकट मिळणारी दहा लाखांचे चारचाकी वाहन कोणाला नको असते ? त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या लिंकवर क्लिक केले जाते . तेथूनच फसवणुकीच्या दिशेने प्रवास सुरू होतो.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *