केवळ पाच महिने उपमहापौर राहीले केशव घोळवे…
पुढील उपमहापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार…
पिंपरी-चिंचवड
रोहीत खर्गे
05/03/2021
पिंपरी चिंचवड चे उपमहापौर कामगार नेते केशव घोळवे यांचा ६ महिन्याचा कार्यकाळ पूर्ण होण्यास एक महिना बाकी असतानाच त्यांनी आज शुक्रवार दि ५ मार्च रोजी तडकाफडकी राजीनामा दिला आहे…
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या
महापौर माई ढोरे यांच्याकडे त्यांनी सायंकाळी पक्षश्रेठीच्या आदेशानंतर राजीनामा सुपूर्द केला आहे…
माजी महापौर तुषार हिंगे यांच्या राजीनाम्या नंतर उपमहापौर पदाच्या शर्यतीत अनेक नांवे असताना माजी मंत्री पंकजा मुंढे यांचा राजकीय दबावतंत्राचा वापर करत केशव घोळवे यांच्या गळ्यात उपमहापौर पदाची माळ पडली होती…
नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत सभापती पदासाठी भारतीय जनता पार्टीत अनेक इच्छुक असताना नितीन लांडगे यांची वर्णी लागली.यात जे नाराज झाले त्यातील कुणा एकाची नाराजी दुर करण्यासाठी केशव घोळवे यांना राजीनामा द्यावा लागला असल्याची चर्चा होत आहे…