सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये शिवसेना ताकतीने उतरणार

रामदास सांगळे
विभागीय संपादक, जुन्नर
१६ डिसेंबर २०२१

बेल्हे 


आगामी महापालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे भगवे वादळ येणार असून या निवडणुकांमध्ये शिवसेना नक्की विजय मिळवेल तसेच आगामी सहकार क्षेत्रातील होणाऱ्या निवडणुकांमध्ये शिव सहकार सेनेच्या माध्यमातून शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. असे प्रतिपादन मंत्री शिवसेना उपनेते,भारतीय कामगार सेना सरचिटणीस व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केले. पुणे जिल्ह्यातील सर्व जिल्हाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख व शिवसैनिक यांच्या समवेत कंट्री क्लब उंडरी येथे महत्त्वाची बैठक पार पडली. शिव सहकार सेनेचे अध्यक्ष शिल्पा सरपोतदार यांच्या सूचनेवरून पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रदीप खोपडे यांनी सहकार विषयी विस्तृत मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा शिव सहकार सेना संघटक तथा पुरंदर तालुका पंचायत समिती, माजी पंचायत समिती व विद्यमान सदस्य रमेश जाधव यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या बैठकीत शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना अनेक विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना सचिन अहिर म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकट काळातही राज्याचा कारभार उत्तम रित्या चालविला आहे. सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. या जोरावरच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेची भगवी लाट निर्माण होणार असून पक्षाच्या आदेशानुसार सहकार क्षेत्रातील सर्व गाव पातळीच्या, तालुका पातळीच्या, जिल्हा परिषद निवडणुका तसेच दूध संस्था, विविध कार्यकारी सोसायटी, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने इत्यादी निवडणुकांमध्ये आपण शिव सहकार सेनेच्या माध्यमातून ताकतीने उतरणार आहोत. यासाठी संघटना बांधणी वर सर्वांनी भर द्यावा असे आवाहन ही अहिर यानी केले. सहकार क्षेत्रातील निवडणुका पक्षाच्या आदेशानुसार लढवण्याचे ठरवले असा ठराव करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, महेश पासलकर, शरद सोनवणे,भास्कर गाडगे,बाळासाहेब चांदेरे, माऊली कटके, विजय देशमुख, गजानन थरकुडे,संजय मोरे,सचिन भोसले, संजय डफळ,मिलिंद हांडे, दिलीप तांबोळी,विलास कारेकर, दिलीप यादव,ज्ञानेश्वर डफळ,शैलेंद्र वालगुडे, सचिन खैरे,पोपट शेलार, रामदास घनवटे, संजय काळे,नितीन जगताप, चंदन मूरे,राजेश सोनवणे, राजेंद्र बाबर, नितीन वाघ,योगेश पाटील,अशोक मांजरेकर,दयानंद शिंदे,अशोक हरणावळ,बाळासाहेब मालुसरे,स्वप्नील कुंजीर यांच्यासह अनेक मान्यवर बैठकीस उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *