ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयांचे निर्देश

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१३ ऑक्टोबर २०२२

मुंबई


अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राजीनामा स्वीकारल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला दिला आहे. ऋतुजा लटके यांना या निर्णयामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे.ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

ऋतुजा लटके या महानगरपालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यांचे पती रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर आलेल्या पोटनिवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतलाय.पण, ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी होत्या, त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला होता, पण तो मंजूर होत नव्हता, राजीनामा मंजूर होईपर्यंत त्यांना उमेदवारी अर्ज भरता येत नव्हता. पण कोर्टानं आता राजीनामा मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *