दोन दिवस शहरात पाणीपुरवठा विस्कळीत

पिंपरी प्रतिनिधी
१२ ऑक्टोबर २०२२


पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील मुख्य जलवाहिनीमध्ये बिघाड झाला आहे . त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे . त्यामुळे गुरुवारी दि . १२ ) सांयकाळी , शुक्रवारी ( दि . १३ ) सकाळी शहरातील पाणीपुरवठा नियमित होणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने कळवले आहे. रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील मुख्य जलवाहिनीचे काम करायचे असल्याने शहरात पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आह .

त्यामध्ये थेरगाव , काळेवाडी विजयनगर , रहाटणी , वाकड , पिंपळे सौदागर , कुणाल आयकॉन टाकीवरील भाग , पिंपळे निलख विशालनगर , पुनावळे , ताथवडे , रावेत सेक्टर २ ९ च्या टाकीवरील भागासह किवळे , मामुर्डी , विकासनगर , जिल्हा रुग्णालय व उरो रुग्णालय सांगवी या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे . तसेच बालेवाडी स्टेडियम , निगडी प्राधिकरण , सेक्टर क्रमांक २१ ते २८ , आकुर्डी , खंडोबा माळ , मोहननगर , रामनगर , संभाजीनगर , शाहूनगर , इंद्रायणीनगर , पांजरपोळ , बोऱ्हाडेवाडी मोशी , डुडुळगाव , वडमुखवाडीचोविसावाडी , जाधववाडी , कुदळवाडी , फुलेनगर , शिवतेज़नगर , पूर्णानगर , शरदनगर , सुदर्शननगर , नेवाळे वस्ती , हरगुडे वस्ती , पवार वस्ती , रुपीनगर , चिखली या भागांतील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे . या भागामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा दुरुस्तीच्या कामामुळे परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *