पदवीधरच्या दहा जागांसाठी 37 उमेदवार, संबंधित जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान

०८ नोव्हेंबर २०२२

पुणे


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पदवीधर मतदारसंघातून 68 उमेदवारांचे 98 अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 31 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता पदवीधर च्या दहा जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात आहेत. संबंधित जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 22 नोव्हेंबरला विद्यापीठात मतमोजणी होणार असलयाची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

पुणे विद्यापीठाचे पदवीधर, तसेच पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या व पुणे विद्यापीठाची स्थापना होण्यापूर्वी मुंबई विद्यापीठाचे पदवीधर असलेल्या व्यक्ती विद्यापीठात नोंदणीकृत पदवीधर म्हणून नाव नोंदविण्यास मुभा देण्यात आली होती. तसेच नोंदणीसाठी 3 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. 4 नोव्हेंबरला छाननी आणि 5 नोव्हेंबरला अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार काही उमेदवारांनी माघार घेतली, तर काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. अर्ज बाद झालेल्या उमेदवारांमध्ये नामनिर्देशन पत्रावर सूचक व अनुमोदक यांची स्वाक्षरीची तारीख नमूद केलेली नाही, नामनिर्देशनाच्या दिनांकापूर्वी किमान पाच वर्षे पदवीधर नाही, अर्जदाराच्या नावबदलाचा पर्याप्त पुरावा नाही, अशा प्रकारची कारणे नमूद करण्यात आलेली आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *