मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ ऑक्टोबर २०२२


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य या बैठकीस उपस्थित होते.

या बैठकीत झालेले मंत्रिमंडळ निर्णय –

१. माणगाव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे न्यायालये स्थापन करून पदनिर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २० पदांना मान्यता देण्यात आली असून यासाठी १ कोटी ११ लाख ३१ हजार इतका खर्च येणार आहे.

२.अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित धोरणास मान्यता देण्यात आली. नव्या धोरणामुळे मनोरा आणि वाहिनी उभारणी वेगाने होऊन वीज निर्मितीस मदत होणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *