हिरडा प्रश्नावर ‘ ट्रायबल फोरम ‘ आंदोलन उभारणार

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२४ डिसेंबर २०२१

आंबेगाव 


ट्रायबल शेतकरी फोरमचे अध्यक्ष अंकुश करवंदे यांचा इशारा

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम विभागात आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणजे हिरडा विक्री परंतु हिरड्या ला अत्यंत कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे त्यातच औषधी उपयोगासाठी वापर करण्यात येणारा बाळहिरडा यालाही योग्य भाव मिळत नाही म्हणून ट्रायबल फोरम संघटनेच्या माध्यमातून आंदोलन उभारणार असल्याचं ट्रायबल शेतकरी फोरमचे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष अंकुश करवंदे यांनी इशारा दिला आहे तळेघर येथील ट्रायबल फोरमच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी अवकाळी पावसामुळे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान होत असले कारणाने त्याचे पंचनामे त्वरित करायला हवेत शासनाने योग्य वेळी दखल घ्यायला हवी त्याच बरोबर रब्बी हंगामातील गहू ,हरभरा या पिकांचेही पंचनामे करायला हवेत अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येणार असल्याचे ट्रायबल फोरमचे धर्मा आढारी यांनी सांगितले यावेळी ट्रायबल फोरमचे तालुकाध्यक्ष डॉ हरीश खामकर कार्याध्यक्ष दीपक चिमटे उपाध्यक्ष सोमनाथ गेंगजे महासचिव विषाल दगडे युवक अध्यक्ष अमोल दाते सुहास रोंगटे सचिन भागीत व ट्रायबल फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *