पक्षात प्रवेश करण्यास नकार दिल्याने भाजपा सौरव गांगुलीचा अपमान करत आहे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ ऑक्टोबर २०२२


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी सौरव गांगुलीच्या जागी १९८३च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची वर्णी लागल्याची शक्यता आहे. रॉजर बिन्नी यांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. १८ ऑक्टोबरला BCCI ची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून त्याच दिवशी मंडळाची निवडणूक पार पडणार आहे. यादरम्यान तृणमूल काँग्रेसने मात्र गंभीर आरोप केला आहे. पक्षात प्रवेश केला नसल्यानेच भाजपा सौरव गांगुलीचा अपमान करत असल्याचा त्यांचा दावा आहे.

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी म्हटलं आहे की भाजपाने गतवर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान सौरव गांगुली पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगवली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह BCCI च्या सचिवपदी सलग दुसऱ्यांदा कायम राहण्याची शक्यता आहे, मात्र सौरव गांगुलीना पद नाकारण्यात आलं हे राजकीय सूडबुद्दीचं उदाहरण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.भाजपाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपण कधीही सौरव गांगुलीला पक्षात आणण्यासाठी प्रयत्न केला नसल्याचं भाजपाने सांगितलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *