पंचतारांकित रांजणगाव MIDC जवळ घातक केमिकल शेतात व रस्त्यात टाकल्याने लोकांच्या व जनावरांच्या जीविताला धोका – नाथाभाऊ पाचर्णे, शिवशंभू जिजाऊ सेना…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर :  दि. 30/05/2021.

        पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असणाऱ्या, रांजणगाव MIDC च्या जवळ असणाऱ्या कर्डे घाटामध्ये, रस्त्याच्या कडेला व शेताला लागून काही अज्ञातांनी शनिवार दि. २९ मे च्या रात्री, घातक रसायन उघड्यावर टाकलेय. ही घटना रविवार दि. ३० मे २०२१ रोजी, तेथील काही शेतकरी व प्रवाश्यांनी पाहिली. त्यावेळी, त्यातून उकळ्या येत असल्याचे त्यांना दिसल्याने लोक घाबरून गेले. ही वार्ता सर्वत्र पोचली. शिवशंभू जिजाऊ सेनेचे तालुकाध्यक्ष नाथाभाऊ पाचर्णे यांनी घटनास्थळी समक्ष भेट दिली. हे रसायन म्हणजे कारखान्यांमधील टाकाऊ पदार्थ ( वेस्ट मटेरियल ) असून, ते ज्वलनशील व धोकादायक आहे.

त्यामुळे त्यांनी लगेचच पुणे जिल्हाधिकारी, पुणे पोलीस अधीक्षक, MIDC कार्यालय व प्रशासनातील इतर कार्यालयांना पत्राद्वारे व मेलद्वारे तक्रारी केल्यात. रांजणगाव MIDC मधील घातक कचरा व केमिकलची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी येथील एका कंपनीवर आहे, मात्र त्या कंपनीचा व शेजारील अनेक गावातील शेतकऱ्यांचा, या प्रदूषणाबाबत नेहमीच वाद होतोय. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मात्र शासन डोळेझाक करताना दिसून आले आहे. 

त्यामुळेच निर्ढावलेल्या अशा मुजोर कंपन्यांचे अधिकारी आपली मनमानी करत आहेत व लोकांच्या जीविताला धोका निर्माण करत आहेत.
या गोष्टीचा पाठपुरावा आमची संघटना करत राहील, असे पाचर्णे यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कला माहिती देताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *