भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.८ टक्के राहणार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ ऑक्टोबर २०२२


आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक विकास अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. या अहवालात IMF ने भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज वर्तविताना तो ६.८ टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे.

तसेच जगात सध्या मंदीचे सावट असतानाही भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे आयएमएफकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ७ टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. आयएमएफनुसार, देशातील महागाई आणि बेरोजगारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याबरोबच करोनामुळे उद्भवलेली आव्हाने अद्यापतरी संपलेली नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *