पुणे भिमाशंकर रोडवर शिंदेवाडी पिंपळगांव घोडे येथे खासगी बसला भीषण आग

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ ऑक्टोबर २०२२


नाशिकमधील बस दुर्घटनेची घटना ताजी असतानाच आता आणखी एक थरकाप उडवणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस पेटली. या बसमधून 27 प्रवासी प्रवास करत होते. आगीमध्ये ही बस पूर्णपणे जळून खाक झालीय. सुदैवानं या घटनेमध्ये कोणताही जीवितहानी झाली नाही. मात्र भरस्त्यातच या बसने पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

 

आग लागलेली खासगी बस ही भीमाशंकर इथं जाणारी होती. एका खासगी कंपनीची ही बस असून कंपनीचं नाव कळू शकलेलं नाही. पुणे जिल्ह्यातील घोडेगाव शिंदेवाडी गावाजवळ या बसने पेट घेतला. थोडक्यात जीव वाचल्याने या बसमधील प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास सोडलाय. दरम्यान, या बसमध्ये नेमकी आग कशामुळे लागली, हे कळू शकलेलं नाही. शॉर्ट सर्टिकमुळे या बसने पेट घेतला असावा, अशी शंका व्यक्त केली जाते आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *