रक्तदानातून उत्तम समाजसेवा करता येते – रूपाली चाकणकर… राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीत रक्तदान शिबीर…


 
रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि २३ जुलै २०२१
रक्तदान हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे. रक्तदान हे नि:स्वार्थ भावनेनं केलं पाहिजे. कारण आपल्या एका रक्तदानातून कुणाला तरी जीवदान मिळणार आहे. रक्तदानासारखं कोणतंही श्रेष्ठ दान नाही. त्याचा आनंद प्रत्येकानं घ्यायला हवा. रक्तदानातून उत्तम समाजसेवा करता येते. असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेशअध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.
     राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयतिल प्रांगणात राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरा उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शहरअध्यक्ष संजोग वाघेरे, संस्थेचे अध्यक्ष माजी  आमदार विलास लांडे, माजी महापौर मोहिनीताई लांडे, नगरसेवक विक्रांत लांडे, माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे, जगदीश शेट्टी, प्रकाश सोमवंशी , विराज लांडे, विनया मुंगसे, कांचन लांडे, प्राचार्य डॉ.अशोक पाटील, उपप्राचार्य प्रा . किरण चौधरी , रजिस्ट्रारअश्विनी भोसले, कार्यक्रम अधिकारी प्रा . दिपक पावडे , प्रा . सविता वीर , सर्व प्राध्यापक वृंद , प्रशासकिय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
  या वेळी भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे म्हणाले की ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची एक संधी म्हणजे रक्तदान. हे दान आपल्याला मिळवून देते समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण सर्वांनी रक्तदान करणे काळाची गरज आहे. एक रक्तदाता म्हणून सहभागी होऊन आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला प्रवृत्त करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. ज्यांना रक्तदाता होता आले नाही त्यांनी इतरांना प्रोत्साहित करून प्रेरणा दाता नक्की होता येते असे आव्हान यावेळी भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांनी केले . रक्तदान शिबिरात ६४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला , वाणिज्य , विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *