भूखंडाचे श्रीखंड खाल्लं कोणी? विरोधकांची विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी

२२ डिसेंबर २०२२


राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. दरम्यान आज नागपुरात तब्बल १२मोर्चे निघणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर श्रीखंडाचे डब्बे वाटून विरोधकांचे आंदोलन सुरु आहे.

भूखंडाचे श्रीखंड खाल्लं कोणी? घोषणा बाजी देत विरोधकांचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन जोरदार सुरु आहे. राज्यपाल हटवा महाराष्ट्र वाचवा, घ्या खोके भूखंड ओके अशा घोषणा देण्यात आला आहे. श्रीखंडाचे डबे वाटत हे आंदोलन करण्यात आले आहे. नागपुरातील NIT भूखंड घोटाळ्याप्रकरणी विरोधक आक्रमक झाले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *