फ्लॉवरच्या पिकातील पावसाचे पाणी काढून शेतकऱ्यांने मिळवले भरघोस उत्पादन

रामदास सांगळे
विभागीय संपादक
११ ऑक्टोबर २०२२

राजुरी


सतत पडणाऱ्या पावसाला न डगमगता शेतकऱ्यांनी वारंवार शेतातील पाणी काढून आपले फ्लाॅवरचे पीक टिकवले असून चांगले उत्पादन मिळेल आहे.त्यामुळे या शेतकऱ्याच परिसरातून कौतुक होत आहे. राजुरी (ता.जुन्नर) येथील कैलास गायकर शेतक-यांने धवल जातीच्या फ्लॉवर चे पिक घेतलेले असुन यामधुन त्यांना चांगल्या प्रकारचा नफा मिळत आहे.

अशी केली लागवड –

सुरवातीला या शेतात प्रथम सुरवातीलाच या शेतात ४ ट्राली शेणखत टाकले. त्यांनी शेत नांगरणी केली दहा ते बारा दिवस शेत तापत ठेवले. नंतर हे शेताला पाळी घातली व दिड फुटांच्या अंतरावर टॅक्टर च्या साह्याने लागवडीसाठी सरी काढली. त्यानंतर गायकर यांनी नारायणगाव येथुन अभिषेक नर्सरी मधुन धवल या जातीची पंधरा हजार रोपे आणुन एक फुटाच्या अंतरावर लागवड करण्यात आली.लागवडी नंतर त्यांणी जैविक खत, गांडुळ खत या खताची मात्रा देण्यात आले. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असताना देखील इतर शेतकऱ्यांचा पिकांमध्ये पावसाचे पाणी साचुन पिके सडलेली असताना गायकर यांनी शेतात साचलेले पाणी वेळोवेळी बाहेर काढुन दिल्याने रोपे जगली आहेत. फ्लॉवर हे पिक सत्तर दिवसांमध्ये काढायला येत असते गायकर यांनी घेतलेल्या या पिकामधुन आठ टन माल निघणार असुन यासाठी त्यांना ३० ते ३५ हजार रुपये खर्च आलेला. सध्या बाजार भाव हा दहा किलोला १५० ते ३०० रुपयांपर्यंत असुन यामधुन त्यांना ८० ते ९० हजार रुपयांचा नफा मिळणार आहे. हे पिक घेत असताना त्यांचे वडील दत्तात्रय आई धोंडाबाई ,भाऊ विलास, पत्नी शुभांगी यांची मोलाची साथ मिळाली असुन कृषी पर्यवेक्षक शिवकांत कोल्हे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे.तसेच यापुर्वी ही त्यांनी आठच महीन्यात चार एकर क्षेत्रात दोनशे टनाच्या व ऊसाचे उत्पादन घेतलेले आहे.

“गायकर हे नेहमीच वेगवेगळी पिके घेऊन चांगल्या प्रकारे शेती करत असतात. त्यांनी या वेळेस फ्लॉवर चे पिक अतीशय चांगल्या पद्धतीने घेतलेले असुन त्यांची जैविक खते वापरलेली असुन विशेष करुन त्यांनी कडुलिंब,करंजी,सिताफळ,एरंड,बेल,पपई,निरगुडी,रूई,गुळवेल,धोत्रा यांची समप्रमाणात पाने घेऊन १ किलो ग्रॅम मध्ये १०० लिटर पाण्यात १ किलो देशी गाईचे शेण व गोमुत्र व हळद व आल्याचा बारीक कुट करुन सात दिवस भिजत ठेवले व आठव्या दिवशी गाळुन या झालेल्या जैविक दशपर्णी अर्क तयार सकाळच्या प्रहारी फवारणी केली .ही फवारणी केल्याने पिकावर कुठल्याच प्रकारची किड लागत नाही शेतकऱ्यांणी या फवारणीचा वापर पिकांणा केल्यास पिक चांगल्या प्रकारे येऊन यामधुन नफा चांगला मिळणार आहे.” – शिवकांत कोल्हे, कृषी पर्यवेक्षक


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *