श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी मंगलमय व भक्तिमय वातावरणात श्रींचा जन्मोत्सव सोहळा संपन्न

दि.२५ जानेवारी २०२३

ओझर – 

आज दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी भाद्रपद शुद्ध चतुर्थी श्री गणेश जयंती सोहळा श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी गणेश भक्तांच्या उपस्थितीत अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाला. श्री गणेश जयंती निमित्ताने विघ्नहरास सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले होते. तसेच उद्या आपला प्रजासत्ताक दिन असल्याने तिरंगा ध्वज देखील बाप्पांच्या बाजूला ठेवण्यात आला होता. बाप्पांच्या आवडीचे 2100 मोदक व हिंदू धर्म संस्कृतीत पवित्र मानले जाणारे चारही वेद बप्पांपुढे ठेवण्यात आले होते.

गणेश जयंती निमित्त ह. भ. प. गणेश महाराज वाघमारे यांचे गणेश जन्माचे सुस्त्राव्य असे किर्तन यावेळी संपन्न झाले. फुलांची उधळण होत ,मोरया विघ्नहर्ता बाप्पाचा जयघोष होत ,हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजून 55 मिनिटांनी गणेश जन्म संपन्न झाला. संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला होता ,त्यामुळे एक प्रसन्न वातावरण या ठिकाणी पहावयास मिळत होते.विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष गणेश भाऊ कवडे व त्यांच्या संपूर्ण टीमचे योग्य नियोजन व व्यवस्थापन व ओझर गावचे ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्याने आलेल्या सर्व गणेश भक्तांना गणरायाचे काही मिनिटात दर्शन या ठिकाणी होत होते.

बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेश भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .देवस्थान ट्रस्टमार्फत सर्व गणेश भक्तांना खिचडी ,शुद्ध पिण्याचे पाणी व प्रसादाचे वाटप यावेळी करण्यात आले.

अखंड हरिनाम सप्ताह , श्रींची आरती ,गणेशपुराण ,पारायण पोथी ,वाचन तुकाराम गाथेवरील भजन , द्वार यात्रा ,धुपयार्थी ,छबिना व श्रींची पालखी मिरवणूक इत्यादी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आज मंगलमय वातावरणात पार पडले. पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत हजारो भाविकांनी बाप्पांचे दर्शन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *