नेक्स जेन इंव्हेन्टीव्ह इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी प्रा.लि चे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर अभिषेक कुमार बर्मन यांना सीएसआर जर्नल संस्थेच्या वतीने नुकताच “सोशल वेल्फेअर & ग्रोथ अवॉर्ड भारताचे संरक्षणमंत्री ना. राजनाथसिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मुंबई स्टॉक एक्स्चेंज येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, वन व सांस्कृतिक कार्यमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार, आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमात कुमार विश्वास, श्रीकांत शिंदे, युवराजसिंग व अन्य मान्यवरांनाही विविध क्षेत्रांतील अतुलनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. एन्टरप्रिणर एक्सलंस & डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशन नेक्समनी या अॅप्लिकेशन बद्दल हा सन्मान करण्यात आला. हे डिजिटल अॅप्लिकेशन आहे ज्यात नागरिक आपले सर्व डिजिटल व्यवहार करू शकतात. यात रोजगार संधी उपलब्ध होतात. गेली १० वर्ष हे कार्यरत आहे.
ग्रामीण भागातील मातीत भविष्यातील अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू निर्माण करण्याची क्षमता- Api किरण भालेकर
आंबेगाव ब्युरोचिफ मोसीन काठेवाडी “महिला आज सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे हे कौतुकास्पद आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय…