शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ ऑक्टोबर २०२२


निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ‘ढाल तलावर’ चिन्ह देण्यात आलं आहे. काल निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाने दिलेली तिन्ही चिन्हं रद्द करत आज नवीन चिन्ह पाठवण्यास सांगितले होते. आज शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन पर्या दिले होते त्यातून त्यांना ढाल-तलवार चिन्ह दिल आहे.

निडणूक आयोगाने सोमवारी दोन्ही गटांना पक्षाची नावं दिली. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव दिलं होतं. शिवाय ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाला दुसऱ्या तीन चिन्हांचा पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर शिंदे गटाने आज ढाल-तलवार, उगवता सूर्य आणि पिंपळाचं झाड ही तीन चिन्हं देण्यात आली होती. त्यातील ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *