भारतीय जनता पार्टीची पुणे जिल्हा ग्रामीण कार्यकारीणी जाहीर…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे.
शिरूर : दि. 18/08/2021.

भारतीय जनता पार्टीने पुणे जिल्ह्यात पुन्हा मोर्चे बांधणी करत, अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुणे येथे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केल्यात.
यावेळी भाजपा चे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी जिल्हा उद्योग आघाडीच्या कामाचे कौतुक केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग क्षेत्राला २० लाख कोटींचे जे पॅकेज दिलेय, त्यामुळे उद्योग श्रेत्राला त्याचा फायदा झाल्याचेही भेगडे यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात ५० हजारांच्या जवळपास छोट्या मोठ्या औद्योगिक कंपन्या असुन, त्याचा लाभ ग्रामीण भागातील तरुणांना मिळवून देण्यासाठी, तसेच कंपन्यांना त्रास होईल तेथे कंपन्यांना सहकार्य करण्याचे अभियान राबविण्यात येणार असल्याचे, भाजपा उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी सांगितले.
यावेळी गणेश आखाडे, दादासाहेब सातव, गोरक्ष काळे, यांनीही मार्गदर्शन केले.

पुणे जिल्हा नूतन कार्यकारीणी : –
१) संजय शिवाजी पाचंगे – जिल्हा अध्यक्ष, उद्योग विभाग.
२) धीरज भळगट – सहसंयोजक.
३) वर्षा फक्कड काळे – उपाध्यक्षा.
४) अजय गणेश जाधव – उपाध्यक्ष.
५) कुलदीप अंकुश माने – उपाध्यक्ष.
६) काशिनाथ शिवराम आवटे – सरचिटणीस.
७) सुवर्णा सुमुख खेडकर – सरचिटणीस. (जबाबदारी – विभाग प्रमुख – महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ)
८) विकास अरुण भोर – सचिव. (जबाबदारी –
विभाग प्रमुख – महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ)
९) बाळासाहेब मारुती बालगुडे – सचिव. (जबाबदारी – विभाग प्रमुख – राज्य औद्योगिक विकास महामंडळ)
१०) अमित रघुनाथ रोकडे – (जबाबदारी – विभाग प्रमुख, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ)
११ ) अभिजीत हनुमंत पवार –
कोषाध्यक्ष. (जबाबदारी – विभाग प्रमुख, महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ)
१२) संजीवनी विठ्ठल रोकडे –
उपाध्यक्ष. (जबाबदारी – विभाग प्रमुख, महीला आर्थिक विकास महामंडळ)
१३) सुनील सुभाष गदादे – प्रसिद्धी प्रमुख.
१४) महेंद्र पोपट ढवळे – सचिव. (जबाबदारी – विभाग प्रमुख, युवा उद्योजक)
१५) भरत मोहनलाल सोळंकी –
सचिव. (जबाबदारी – विभाग प्रमुख – महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ)
१६) सुरेश श्रीपती पिंगळे – सचिव. (जबाबदारी – विभाग प्रमुख – राज्य पर्यटन विकास महामंडळ) इ.

 यावेळी कामगार आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले, तर शिरूर तालुका भाजपा सरचिटणीस गोरक्ष काळे यांनी आभार मानले. 
 या बैठकीवेळी भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, उपाध्यक्ष दादासाहेब सातव, भाजप किसान मोर्चाचे पच्छीम महाराष्ट्र गणेश आखाडे, भाजपा कामगार आघाडी पूणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, अल्पसंख्याक भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष राजु शेख, भाजप सहकार आघाडी पूणे जिल्हाध्यक्ष भगवान पासलकर, मुळशी भाजपा तालुका अध्यक्ष जिवन कोंडे, उद्योग आघाडी शिरुर तालुका अध्यक्ष विजय भोस, सरपंच आघाडी शिरुर तालुका अध्यक्ष रविंद्र  दोरगे, शिरुर तालुका भाजपा महिला अध्यक्ष वैजयंतीताई चव्हाण, शिरुर तालुका भाजपा सरचिटणीस गोरक्ष काळे, शिरुर शहर सरचिटणीस भाजपा रेश्मा शेख, विद्यार्थी आघाडी पूणे जिल्हा उपाध्यक्ष रोहन पाचंगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *