बारामती ॲग्रोच्या संचालकांवर चौकशी; भाजप नेते राम शिंदे यांची मागणी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ ऑक्टोबर २०२२


रोहित पवार विरुद्ध राम शिंदे पुन्हा एकदा सामना होण्याची शक्यता आहे. राज्यातील यंदाचा ऊस गाळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. तरीही इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती ॲग्रो या कारखान्याने आज, सोमवारी गाळप हंगाम सुरू केला आहे. हा सरकारच्या आदेशाचा भंग असल्याने कारखान्याच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप नेते राम शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित हा कारखाना आहे.

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी तातडीनं एक आदेश काढलाय. 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यात कोणत्याही प्रकारच्या उस वाहतुकीवर बंदी घालण्यात आलीय. उस वाहतूक होताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल असं आदेशात म्हंटलंय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *