छत्रपती शिवरायांबद्दल बोलताना चूक झाली असेल तर माफी मागितली पाहिजे – किरीट सोमय्या

०५ डिसेंबर २०२२


छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना काळजी घेऊन बोललं पाहिजे. कुठे कोणाची बोलण्यात चूक झाली असेल त्यांनी ती चूक सुधारायला हवी. गरज पडल्यास माफी ही मागितली पाहिजे अस मत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज देशासाठी पूजनिय, आदरणीय, हिंदू धर्माच रक्षण करणारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल संबंध हिंदुस्थानला अभिमान आहे. आम्ही सर्व जण प्रेरणा घेतो. प्रत्येक जण त्यांच्या कार्याच कौतुक करतो. प्रत्येक माणूस आदराने प्रेमाने पाहतो. पुढे ते म्हणाले की, कुठे कोणाची बोलण्यात चूक झाली असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे. सगळे शिवाजी महाराजांना मानतात. कोणाची काही बोलण्यात चूक झाली असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे. चूक सुधारायला हवी, गरज पडल्यास माफी ही मागितली पाहिजे अस मत किरीट सोमय्या ह्यांनी व्यक्त केलं आहे.