बी.डी काळे महाविद्यालय येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ

२९ नोव्हेबर २०२१

घोडेगाव


घोडेगाव – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील राज्यशास्र विभाग व युगप्रर्वतक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव यांनी केले. सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते संविधान प्रतीचे पूजन करण्यात आले.तसेच संविधानातील उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन प्रा. सुनील नेवकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांमध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गौतम खरात,महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.संजय आर्विकर,आंबेगावचे गटविकास अधिकारी श्री.जालिंदर पठारे इ. नी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री.आकाश पाटील,जळगाव यांनी आपल्या मनोगतातून भारतीय संविधाना बद्दल उपयुक्त अशी माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन श्री.अजितशेठ काळे, संस्थेचे खजिनदार श्री.शिवदास काळे, नायब तहसिलदार दामुराजे असवले,मंडल अधिकारी श्री. विश्वास शिंदे,सरपंच क्रांती गाढवे,ज्योती घोडेकर,श्री.खंडू खंडागळे,प्रा.सुनिल नेवकर इ. मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी संविधान या विषयावर सामान्यज्ञान चाचणी परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेसाठी एकूण ३०० विद्यार्थी उपस्थित होते.तसेच भारतीय राज्यघटना निर्मितीमध्ये ज्या महिलांनी सहभाग घेतला होता त्यांच्या विषयीच्या माहितीचे संकलन असलेले आणि प्रा.डॉ. चांगुणा कदम यांनी संपादित केलेल्या युवातरंग या भित्तिपत्रकाचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. माणिक बोऱ्हाडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा. सचिन घायतडके यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *