ही उद्धव बाळासाहेब सेना नव्हे तर उद्धव काँग्रेस सेना आहे; रवी राणा यांची उद्धव ठाकरेंवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ ऑक्टोबर २०२२


शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचं वाटप केल असून चिन्हही दिलं आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळालं असून, ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावासाठी मान्यता देण्यात आली आहे. यानंतर आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

ही उद्धव बाळासाहेब सेना नव्हे तर उद्धव काँग्रेस सेना आहे, असं रवी राणा म्हणाले आहेत. तसंच एकनाथ शिंदेंचींच खरी शिवसेना असल्याचंही म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांची सेना ही काँग्रेसच्या विचाराची सेना आहे. काँग्रेसच्या विचारांची सेना असल्याने त्यात पहिलं नाव उद्धव ठाकरेंचं आहे. एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने न्याय दिला असून, त्यांचीच खरी शिवसेना आहे,असं रवी राणा म्हणाले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा एकनाथ शिंदेंकडे आहे. येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिका व पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे व भाजपाची एकहाती सत्ता येईल, असंही ते म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *