‘बाळासाहेबांची शिवसेना’; नाव मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेची प्रतिक्रिया

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ ऑक्टोबर २०२२


शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या दृष्टीने निवडणूक आयोगाकडून एक मोठा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलं आहे. याशिवाय ठाकरे गटासाठी ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाचे तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगानं अमान्य केली असून पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असा आदेश निवडणूक आयोगानं दिला आहे.

आयोगाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतचा फोटो आणि “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार” असं लिहित ट्विट केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना शुभेच्छा देतो. एक चांगली सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. निवडणूक आयोगाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो.आम्ही जी तीन चिन्ह दिली होती, ती चिन्ह रद्द केली असली, तरी आता दुसरी चिन्ह दिली जातील आणि त्यातून एक चिन्ह आम्हाला मिळेल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *