शहरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे

पिंपरी प्रतिनिधी
१० ऑक्टोबर २०२२


शहरातील ज्यागृहनिर्माण , हॉटेल्स , रेस्टॉरंट , कंपन्या किंवा इतर आस्थापनांमध्ये प्रतिदिन १०० किलो आणि त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होतो , अशा आस्थापनांनी त्यांच्या स्तरावर कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे , असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले . ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून जिरवणे बंधनकारक नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियम २०१६ अन्वये प्रतिदिन १०० किलो कचरा निर्माणकरणाऱ्या गृहनिर्माण संस्था अथवा इतर आस्थापना यांनी त्यांच्या आस्थापनेत निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून जिरवणेबंधनकारक आहे.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले , की सद्यस्थितीत शहरामध्ये सुमारे ८५ टक्क्यांपेक्षा जास्त कचऱ्याचे विलगीकरण होत आहे . केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित आस्थापनांनी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे .
या कचऱ्याचे कम्पोस्टिंग कसे करावे , कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या संस्थाबाबतची माहिती संबंधित आस्थापनांनाव्हावी , यासाठी पालिकेच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते , त्या वेळी ते बोलत होते . पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर या ठिकाणी आयोजित कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ , आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर , आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे , स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक विनोद जळक , सुचेता पानसरे , सोनम देशमुख यांसह गृहनिर्माण संस्था , हॉटेल्स , रेस्टॉरंट , कंपन्या , आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *