मुंबई महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालयं सील; महापालिका आयुक्तांचा निर्णय

२९ डिसेंबर २०२२

मुंबई


मुंबई महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालयं सील करण्यात आली आहे. शिंदे गट-ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांनी निर्णय केला आहे. आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत सर्वच पक्षांची कार्यालयं तात्पुरती सील करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील फक्त सर्व पक्ष कार्यालयच नाही तर विविध समितीच्या अध्यक्षांची दालनं सुद्धा सील करण्यात आली आहेत.अशी नोटीस पक्षांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आली आहे.

शिंदे गट-ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांचा निर्णय

खासदार राहुल शेवाळे, नरेश म्हस्के, यशवंत जाधव, शीतल म्हात्रे आणि गिरीश धानुरकर यांच्यासह शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिकेत जाऊन शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावर आपला हक्क सांगितला. शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही मुंबई महापालिका गाठली. शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळं त्यांना आवर घालताना मुंबई पोलिसांची मोठी पंचाईत झाली होती. अखेर बीएमसीच्या सुरक्षारक्षकांना सोबत घेऊन मुंबई पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पालिकेच्या इमारतीबाहेर काढलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *