शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० ऑक्टोबर २०२२


पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. संजय राऊत सध्या न्यायलयीन कोठडीत असून त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणीसाठी संजय राऊत यांना कोर्टात आणण्यात आले होते. त्यावेळी संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचं नवं चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल आणि भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ. आमच्यात शिवसेनेचं स्पिरीट असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीया आधीही जनसंघ, काँग्रेस यांच्यावरही चिन्ह गोठवण्याची वेळ आली होती. यात काही नवीन नाही. ज्या पक्षांची चिन्ह गोठवण्यात आली, ते पक्ष पुढे जाऊन मोठे झाले. आम्हीदेखील तसेच मोठे होऊ. खरी शिवसेना कोणती आहे, हे लोकांना ठाऊक आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *