पुणे । जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांकडुन एक दिवसाचे वेतन…

पुणे :-
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
कोरोनाच्या दुस-या लाटेचा सामना करण्यासाठी  राज्य सरकारला आर्थिक मदत म्हणुन राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनी मे महिन्यातील एका दिवसांचे वेतन मुख्यमंत्री  सहाय्यता निधीला देउ केलेले आहे. त्याबाबतचे पत्र राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी महासंघाने राज्य अर्थ मंत्री मा. अजितदादा पवारसाहेंबाना दिलेले आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष मा. भाउसाहेब पठाण यांनी दिली आहे.
        महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना हि राज्य सरकारी गट-ड(चतुर्थ श्रेणी) कर्मचारी महासंघाच्या संलग्न मान्यता प्राप्त असल्याने कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्वच संघटनाना मदत करण्याचे आवाहन केले होते, त्यांनुसारच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री संदीपजी चौधरी यांनी सुध्दा महाराष्ट्रातील जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत असलेल्या परिचर (चतुर्थ श्रेणी) कर्मचा-यांना मे महिन्यातील एक दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणुन कपात करण्याचे आवाहन केले आहे.
     कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासांठी मदत म्हणुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या परिचर (चतुर्थ श्रेणी) कर्मचा-यांनी खारीचा वाटा उचलावा अशा स्वरुपाचे आवाहन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष मा राजेंद्र गुळवे  संदीपजी चौधरी यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणुन जिल्हा परिषदेच्या परिचर (चतुर्थ श्रेणी) कर्मचा-यांनी सुध्दा या आवाहनाला प्रतिसाद देत मे महिन्यातील आपल्या वेतनातुन एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कपात करण्यास सहमती दर्शविली असल्याने या मुख्य सहाय्यता निधीमध्ये जिल्हा परिषदेच्या परिचर (चतुर्थ श्रेणी) कर्मचा-यांकडुन संपुर्ण महाराष्ट्रातुन किमान चार कोटी रुपयांची भर पडेल. अशी माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री संदिप चौधरी राजेंद्र गुळवे राज्य कार्याध्यक्ष नितीन भालके उपध्यक्ष  प्रशांत कुंभार कोषाध्यक्ष मुकुंद तुरे साहेब सचिव  दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *