डॉक्टरकडे दरमहिना सात हजार हप्ता मागणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी प्रतिनिधी
१० ऑक्टोबर २०२२


दरमहिना सात हजार रुपये हप्ता द्या , नाही तर तुला दवाखाना चालवू देणार नाही , अशी धमकी डॉक्टरला देणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हा प्रकार पुरुषोत्तम क्लिनिक , शास्त्री चौक , आळंदीरोड येथे बुधवारी ( दि . ५ ) सहाच्या सुमारास घडली . या प्रकरणी पुरुषोत्तम कारभारी राणे ( वय ४२ , रा . इंद्रायणीनगर , भोसरी ) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार , पोलिसांनी सुदर्शन ऊर्फ पिल्या संभाजी राक्षे ( वय २५ ) , गोविंदा कोळी ( वय २४ ) , सचिन सारसे ऊर्फ काळा सच्या ( वय २३ , रा .आनंदनगर , भोसरी ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे . पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार , फिर्यादी हे क्लिनिकमध्ये असताना आरोपी सुदर्शन याने दर महिना सात हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली . तसेच , हप्ता न दिल्यास या परिसरात येऊ देणार नाही , अशी धमकी देत शिवीगाळ केली . तसेच क्लिनिकमधून बाहेर येऊन मेडिकलमधून औषधे घेतली . मेडिकल मालक रोहिदास घेनंद यांनी पैशाची मागणी केली असता , ऐ माकडा कसले पैसे मागतो , मी कधी कोणाला पैसे देतो का , तुला माहिती नाही का , असे म्हणत आरोपी निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *