पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतले राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे दर्शन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१४ फेब्रुवारी २०२२

आकुर्डी


Environment and Tourism Minister Aditya Thackeray pays homage to Rahul Bajaj
पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतले राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे दर्शन

प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे शनिवारी (दि. 12) पुणे येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवारी (दि. 13) त्यांच्या बजाज कंपनीच्या आवारातील निवासस्थानी आणण्यात आले. त्यावेळी युवासेना प्रमुख, राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, संपर्क प्रमुख सचिन अहीर, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, नगरसेवक प्रमोद कुटे आदी उपस्थित होते.

राहुल बजाज यांनी 1968 साली बजाज ऑटो मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून काम करण्यास सुरुवात केली. 1965 ते 2008 या कालावधीत तीन कोटींपासून ते दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल करण्याचा प्रवास या कंपनीने केला. त्यात राहुल बजाज यांचे योगदान अधिक आहे. त्यांना पदमभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

“राहुल बजाज हे कंपनीच्या आवारात राहणारे एकमेव उद्योजक होते. राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. कामगारांबाबत त्यांना विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या जाण्याने कामगार वर्ग देखील हळहळ व्यक्त करीत आहे, अशा शब्दात खासदार श्रीरंग बारणे यांनी राहूल बजाज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *