शिरुरचे ट्रेझरी कार्यालय कचऱ्याच्या विळख्यात : इतर कार्यालयांचा कचरा व कँटीनचा ओला कचरा टाकला जातो इथे

रवींद्र खुडे 
विभागीय संपादक                                
 ऑक्टोबर २०२१ 

शिरूर

शिरूर येथील प्रशासकीय इमारतीखाली कचऱ्यांचा ढीग साठला असून, त्यामधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांना व काही कार्यालयांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.शिरूर येथे सर्व कार्यालयांना एकाच ठिकाणी जागा उपलब्ध व्हावी म्हणुन, आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नामुळे प्रशासकीय ईमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीमधे तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, सामाजिक वणीकरण ही कार्यालये आहेत. तसेच या ईमारतीच्या बाजुला पोलिस स्टेशन, शासनाची ट्रेझरी कार्यालय आहे. येथील ट्रेझरी कार्यालयाशेजारील मुतारी शेजारीच, येथील इतर कार्यालय व कॅन्टीन मधील कचरा आणुन टाकला जातोय. त्यामधे ओला व सुका कचरा एकत्र असल्यामुळे, त्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. अनेक महत्वाचे अधिकारी या इमारतीमधे असतानाही, येथे सुटलेली दुर्गंधी कधी दूर होणार असा सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

शिरुरचे ट्रेझरी कार्यालय कचऱ्याच्या विळख्यात : इतर कार्यालयांचा कचरा व कँटीनचा ओला कचरा टाकला जातो इथे

सध्या तरी येथील ट्रेझरी कार्यालय कचऱ्याच्या विळख्यात असल्याचे चित्र आहे. या कचऱ्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात डास झालेले आहेत. येथील कचऱ्याची विल्हेवाट व नियोजन होत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. येथील घाणीमुळे सध्या शिरूर शहरात जोर धरलेल्या डेंग्यू या साथीच्या रोगाची लागण जर येथील कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना झाली, तर नवल वाटू नये.या कचऱ्याचा सर्वात जास्त त्रास होतोय, तो कोषागार (ट्रेझरी) कार्यालयाला. या कार्यालयाच्या आसपास कचरा, गवत व पोलीस स्टेशनने जप्त केलेल्या दुचाकी आहेत. त्यामुळे कचऱ्याशिवाय या ठिकाणच्या दुचाकी हलवून, तेथील साफसफाई होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *