उद्धव ठाकरे यांनी पाठवलेली चिन्हं निवडणूक आयोगाच्या यादीत नाही, संजय शिरसाटा यांचा दावा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० ऑक्टोबर २०२२


निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तीन नवीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. यामध्ये उगवता सूर्य, धगधगती मशाल आणि त्रिशूळ अशा चिन्हांचा समावेश आहे. पण ही चिन्हं निवडणूक आयोगाच्या यादीत नसल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी पाठवलेली चिन्हं निवडणूक आयोगाच्या १९७ च्या यादीत नसल्याचं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे. तर शिंदे गटाकडून पाठवलेली तीन पैकी दोन चिन्हं निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असल्याचीही शिरसाट यांनी सांगितलं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठावल्या प्रकरणी संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या गटाने वेळेच्या आत एफिडेव्हिट सादर करायला हवं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. संबंधित एफिडेव्हिट सादर करण्यासाठी निवडणूक आयोगानं त्यांना चार तारखा दिल्या होत्या. तरीही त्यांना वेळेवर एफिडेव्हिट सादर करता आलं नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्याकडून दिरंगाई झाली, हे मान्य करावं लागेल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *