स्वार्थी नेत्याच्या आरोपाला किंमत देणार नाही; विनायक राऊतांची नारायण राणेंवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ ऑक्टोबर २०२२


शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली.

विनायक राऊत म्हणाले की, नारायण राणेंसारख्या तकलादू आणि स्वार्थी नेत्याच्या आरोपाला आम्हाला काडीचीही किंमत द्यायची नाही. लाचारी पत्करून राजकारणात काम करणारा माणूस म्हणजे नारायण राणे.

तसेच नितेश राणे यांनी विनायक राऊतही शिंदे गटात जाणार होते, असा गौप्यस्फोट केला होता, त्यावर उत्तर देताना विनायक राऊत म्हणाले की तुम्ही लाचारी पत्करता. त्या लाचारांमध्ये विनायक राऊतांची तुम्ही गिणती नाही करू शकत नाही, असा टोलाही विनायक राऊत यांनी नितेश राणे लगावला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *