धनगरवाडी येथील रमेश शेळके यांच्या विहिरीत म्रुत अवस्थेत आढळला बिबट्या…

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके

जुन्नर तालुका अखत्यारीत धनगरवाडी या गावात रमेश दगडू शेळके यांच्या मळ्यातील विहिरीत मंगळवारी रात्री साधारणतः ११ ते १२ सुमारास बिबट्या आपल्या सावजाचा पाठलाग करीत असताना विहीरीत पडला. रमेश शेळके बूधवारी १० वाजता विद्यूत पंप सुरू करण्यासाठी विहीरीवर गेले असता एका प्लँस्टीकच्या पिशवीमध्ये एक बिबट्या असल्याचे त्यांना दिसून आले.

त्यांनी ताबडतोब धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके यांना फोन करून त्याची माहिती दिली. महेश शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन याची माहिती वन अधिकार्यांना दिली.दरम्यान ह्या विहीरीचे पाणी पिण्यासाठी वापरत असल्या कारणाने स्थानिक तरूणांच्या मदतीने ह्या बिबट्याला बाहेर काढण्यात आले.दरम्यान वन अधिकारी मनिषा काळे आपल्या अधिकार्यांसह घटनास्थळी पोहोचले व नंतर या बिबट्यास मानिकडोह निवारण केंद्रात पुढील तरतुदीसाठी हलविण्यात आले. भक्ष्याचा पाठलाग करीत असताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज मनिषा काळे यांनी व्यक्त केला आहे. हा बिबट्या मादी वर्गातला असून साधारणतः एक वर्षाचा आहे असे मनिषा काळे यांनी सांगितले .सध्या अनेक विहीरींना कठडे नसल्याने बिबट्या विहीरीत पडुन बिबट्यांचे म्रूत होण्याचेप्रमाण वाढले आहे असे लोकांमध्ये बोलले जात आहे.
Total Photos : 02