भोसरी जलतरण तलावाची खोली कमी करण्यासाठी २ कोटी ४० लाखांचा खर्च

१६ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


दुरुस्तीच्या नावाखाली पिंपरी चिंचवड महापालिकेचे अनेक जलतरण तलाव वारंवार बंद ठेवले जातात . त्यासाठीच भोसरी येथील तलाव अनेक महिन्यांपासून बंद होता . आता पुन्हा त्या तलावाचे खोली कमी करण्याचे काम काढण्यात आले आहे . त्यासाठी तलाव किमान एक वर्ष बंद ठेवण्यात येणार आहे . तलावाची खोली अधिक असल्याने पोहताना बुडून मृत्यू झाल्याचे प्रकार घडले आहेत . ते कारण पुढे करून क्रीडा विभागाने सर्व तलावांची खोली कमी करण्याचा निर्णय घेतला आहे . पालिकेचे १२ सार्वजनिक तलाव आहेत . त्यापैकी ७ जलतरण तलावांची खोली ४ ते ७ फुटांपर्यंत आहे . आकुर्डीतील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाची खोली १६ फूट आहे.

मोहननगर , चिंचवड येथील राजर्षी शाहू महाराज जलतरण तलाव , केशवनगर चिंचवड येथील कै . वस्ताद बाळासाहेब गावडे जलतरण तलाव , भोसरी जलतरण तलाव आणि थेरगावातील खिंवसरा पाटील जलतरण तलावाची खोली १४ फूट आहे . या पाच तलावांची खोली जास्त आहे . या तलावांची खोली कमी करण्यात येणार आहे . भोसरी येथील जलतरण तलाव गेल्या एक वर्षापासून बंद आहे . त्याठिकाणी स्थापत्यविषयक कामे सुरू आहेत . आता पुन्हा निविदा काढत खोली कमी करणार येणार आहे . त्यासाठी स्थापत्य विभागाने ३ कोटी २१ लाख ९ ७ हजार रुपयांची निविदा काढली होती . त्यामध्ये देव कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने २६ टक्के कमी दराने म्हणजे २ कोटी ३८ लाख खर्चाची निविदा पात्र ठरली . त्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी दि .१५ झालेल्या स्थायी समिती सभेत मंजुरी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *