समर्थन केलं नाही हा काय खुलासा झाला का, नामर्दपणा आहे; संजय राऊतांची फडणवीसांवर टीका

०३ डिसेंबर २०२२


राज्यपाल यांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे संजय राऊत यांनी भाजपला कडाडून विरोध केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले नाही असं म्हंटले असले तरी त्यांनी निषेध व्यक्त केला नाही, त्यांनी याबाबत खुलासा करणं म्हणजे नामर्दपणा असल्याचे म्हंटले संजय राऊत यांनी आहे.

संजय राऊत म्हणाले, उदयनराजे ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाकडून अपमान झाला आहे, तरीही तो पक्ष अजूनही माफी मागायला तयार नाही. नूपुर शर्मा यांनी मागे विधान एक वादग्रस्त विधान केले होते, त्याला आम्ही विरोध केला होता, संपूर्ण देशात विरोध सुरू झाल्याने त्यांना पक्षातून काढून टाकले होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय प्रवक्ते त्रिवेदी यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यांच्याबद्दल भाजपने निषेध व्यक्त केला नाही. कॅबिनेटमध्ये निंदा प्रस्ताव यायला पाहिजे होता, त्यानंतर तो केंद्राकडे पाठवून त्यांना परत बोलवा म्हणून सांगायला पाहिजे होते. हा नामर्दपणा आहे. समर्थन केलं नाही हा काय खुलासा झाला का? हा खुलासा आमच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे, असं संजय राऊत यांनी म्हंटले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *