आपला आवाज न्यूज नेटवर्क
२६ सप्टेंबर २०२२
पुणे
पुण्यात “पाकिस्तान जिंदाबाद” या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे संकेत दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेनंतर आता पुणे शहर मनसे आक्रमक झाली आहे.
‘पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा आमच्या पुण्यात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देशद्रोह्यांविरोधात पुण्यात तीव्र निदर्शनं केली जात आहेत.
हिंदुस्थान जिंदाबाद !
‘पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा आमच्या पुण्यात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देशद्रोह्यांविरोधात पुण्यात तीव्र निदर्शनं ! pic.twitter.com/l3mrs2zC02
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 25, 2022