बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याला दोन लाखांहून अधिक लोक जमली होती; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ ऑक्टोबर २०२२


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा बुधवारी बीकेसी मैदानावर पार पडला. या मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना लोक उठून निघून जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याचा व्हिडीओंवरुन विरोधकांनी खोचक शब्दांमध्ये टीका टीप्पणी सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे.

आमच्यासाठी बाळासाहेब वंदनीय आहेत. आम्ही त्यांना आमचं दैवतच मानतो. कोणी कितीही काही म्हटलं तरी आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत. याच कारणामुळे राज्याबरोबरच देशभरातील लोक आम्हाला सोबत करत आहेत, असं शिंदे यांनी म्हटलं. पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, कोणी ते व्हिडीओ व्हायरल केले ट्वीस्ट करुन. ते जाऊ द्या. पण शेवटी संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलं. बीकेसीमध्ये किती लोक आले होते? का आले होते? जर आम्ही चुकीचं काम केलं असतं तर एवढी लोकं समर्थनाला आली असती का? असंही मुख्यमंत्री म्हणाले. इतकच नाही तर बीकेसीवर दोन लाखांहून अधिक लोक जमली होती असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *