दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून दीपक चाहर बाहेर; वॉशिंग्टन सुंदरची संघात एन्ट्री

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ ऑक्टोबर २०२२


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय मालिकेसाठी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीनं दीपक चहरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरची निवड केलीय. इंदूरमध्ये खेळण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात दीपक चाहरच्या पाठीला दुखापत झाली. ज्यामुळं लखनऊ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही दीपक चाहर भारताच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग नव्हता. त्यामुळे आता दीपक चहरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरची निवड केली आहे.

भारताचा एकदिवसीय संघ:
शिखर धवन, रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद. सिराज, वॉशिंग्टन सुंदर.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *