‘ सिल्व्हर ओक ‘ हल्ला प्रकरणातील निलंबित एसटी कामगार पुन्हा सेवेत; सरकारचा निर्णय आहे सरकारने ठरवावं शरद पवारांची प्रतिक्रिया

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ ऑक्टोबर २०२२


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. हा हल्ला केल्याचा आरोप असलेल्या ११८ एसटी कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय राज्यामध्ये तीन महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला आहे. शरद पवार यांनी या निर्णयावर अगदी प्रतिक्रिया दिली आहे आहे.

एसटी महामंडळाच्या विविध प्रश्नांसंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एसटीसंदर्भातील कर्मचाऱ्यांचे पगार, वेगवगेळ्या उपाय योजना, सातवा वेतन आयोग, महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण यासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णयही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर घेण्याच्या निर्णयावरील प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी, सरकारचा निर्णय आहे सरकारने ठरवावं, अशी प्रतिक्रिया दिली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *