बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शीरुर : 16/06/2021.
राज्यभरात पेट्रोल डिझेल घरगुती गॅस खाद्यतेल दरवाढीच्या तसेच, वाढीव लाईटबिल व महागाईच्या विरोधात, बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व महिला आघाडी यांच्यावतीने, केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत धक्का मारो आंदोलन करण्यात आलेय.
हे निवेदन शिरूर तहसील कार्यालयात देण्यात आले. निवासी नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांनी त्याचा स्वीकार केला.
तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, प्रवीण खानापुरे यांनाही हे निवेदन देण्यात आले.
15/06/2021 रोजी, बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व माहीला आघाडी यांच्या वतीने, राज्यभरात पेट्रोल, गॅस, डिझेल, घरगुती गॅस, खाद्य तेल इत्यादी गृहोपयोगी वस्तूंच्या दरवाढीच्या व वाढीव लाईटबील, तसेच महागाई विरोधात निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारच्या निषेधार्थ शिरूर तहसील कार्यालयावर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने, धक्का मारो हे अनोख्या पद्धतीचे आंदोलन करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, देशामध्ये कोरोना काळामध्ये केंद्रातील भाजपप्रणीत मोदी सरकारने, पेट्रोलच्या किमती अगदी शंभरी पार नेल्या आहेत. तर डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल यांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे देशामध्ये महागाईचा भडका उडालेला आहे. देशातील सर्वसामान्य जनता अगदी मेटाकुटीला आली असून, भाजप व मोदी सरकार, याकडे दुर्लक्ष करीत आहे. या सरकारला जाग आणण्यासाठी, शिरूर तालुका बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने, धक्का मारो आंदोलन करून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे बहुजन मुक्ती पार्टी चे तालुका अध्यक्ष फिरोज भाई सय्यद व युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कंबळे यांनी सांगितले.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष फिरोजभाई सय्यद, युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे, बहुजन मुक्ती पार्टीचे शहराध्यक्ष समाधान लोंढे, प्राध्यापक श्रीकांत चाबुकस्वार आदी पदाधिकारी उपस्थित होते.