राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी पक्ष कार्यालय येथे पिंपरी चिंचवड शहर पदवीधर अध्यक्ष माधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी पदवीधर संघ पिंपरी चिंचवड शहर कोअर टीमची आढावा बैठक पार पडली…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि २१ जून २०२१
रविवार दि २० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी पदवीधर संघाची आढावा बैठक पार पडली त्यात खालील गोष्टीवर चर्चा व निर्णय घेण्यात आले.
१) बूथ पातळीवर काम करण्यासाठी इच्छुकांची यादी तयार करणे , ती यादी शहर अध्यक्षांना देणे.
२) शासनाच्या पदवीधरांसाठी असलेल्या योजना पिंपरी चिंचवड च्या नागरिकांपर्यंत पोहोचवायच्या असे ठरले.
३) अंधश्रद्धा निर्मुलन अंतर्गत युवकांसाठी लेक्चर सिरीज सुरू करणे.
४) ट्विटर चा वापर करून पदवीधरचे उपक्रम सर्वांना माहीत करून देणे.
५) आपआपल्या भागांमध्ये कोविड योद्धा आईचा सन्मान करणे.
६) दर १५ दिवसांनी झूम मीटिंग घेणे किंवा प्रत्यक्ष भेटणे.
७) पदवीधर संघातर्फे केलेल्या ” शिवभोजन थाळी ॲप” चे उद्घाटन संजोग वाघेरे पाटील साहेब यांना विनंती करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , छगन भुजबळ साहेबांच्या हस्ते करणे यासाठी प्रयत्न करणे.
आदी निर्णय या आढावा बैठकीत घेण्यात आले.

Advertise


यावेळी उपस्थित मान्यवर कार्याध्यक्ष युनूस शेख,
शहर सरचिटणीस राहुल बाळापुरे
पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष जॉन डिसुझा आणि आदित्य धुमाळ,
पिंपरी विधानसभा अध्यक्ष सुप्रीत जाधव,चिंचवड विधानसभा अध्यक्ष वंदना पेडणेकर,
पिंपरी चिंचवड शहर भोसरी विधानसभा उपाध्यक्ष तुषार बोरसे, रोहिणी वारे,स्नेहा शिंदे,जान्हवी पंढरे, चेतन कोठारी आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी भविष्यात भविष्यात हाती कोणकोणते उपक्रम घ्यायचे यावरही चर्चा झाली.