आंबेगाव तालुक्यातील यशवर्धिनी ग्रामिण माहिला स्वयंसिद्ध संघामार्फत कुटुंब प्रमुख गमावलेल्या कुटुंबांना मदतीचा हात…

आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
कुटुंब प्रमुख गमावलेल्या कुटुंबाना बचत गटातील महिलांनी दिला मदतीचा हात
आंबेगाव तालुक्यात यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघामार्फत महिलांचे बचत गटांचे संघटन करून महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण गेल्या २१ वर्षांपासून सुरू आहे.
गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे जवळची नाती दुरावली गेली आहेत. कुणीही कुणाला मदत करायला सहजासहजी तयार होत नाही. परंतु आंबेगाव तालुक्यात गावागावातील महिला स्थानिक पातळीवर कोरोनामुळे अडचणीत आलेल्या कुटुंबास आर्थिक, मानसिक आधार देण्याचे काम करत आहेत.

Advertise

यशवर्धिनी संघाच्या मार्गदर्शनाने आंबेगाव तालुक्यातील महिला बचत गटांतील महिलांनी प्रत्येकी १० रुपये प्रमाणे 35000 निधी जमा करून संस्थेसोबत जोडलेल्या व कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा महिला गमावलेल्या कुटुंबाला 2 महिन्यांचा किराणा मोफत वाटपाचे कार्य सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात 21 कुटुंबाना 2 महिने पुरेल इतके दैनंदिन वापराचे साहित्याचे वाटप त्यांच्या घरात जाऊन करण्यात आले. बऱ्याच ठिकाणी छोट्या मोठ्या मदतीचे फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकले जातात ज्यामुळे त्या कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. यामुळे या मदतीचे कोणत्याही प्रकारचे फोटो घेतले जाणार नसल्याचे आवर्जून संघाचे व्यवस्थापक कुमार घोलप यांनी सांगितले. पुढील काळात या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी जास्तीत जास्त मदत केली जाणार असल्याचे संघाच्या सचिव अलका घोडेकर यांनी सांगितले. हा उपक्रम पुढे घेऊन जाण्यासाठी संघाचे योगिता बोऱ्हाडे अलका डोंगरे , सविता मुंढे, ललिता वरपे, कल्पना एरंडे, सुहास वाघ, सीमा कानडे, हरिभाऊ गेगजे,  शिवाजी शेटे परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *