निवडणूक आयोगाचा निर्णय जो काही असेल तो दोन्ही गटाला मान्य करावा लागेल – शरद पवार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ ऑक्टोबर २०२२

नाशिक


धनुष्यबाण  हे निवडणूक चिन्हं शिंदे गटाकडे जाणार की उद्धव ठाकरे गटाकडे यासंदर्भातील निर्णय लवकरच समोर येणार आहे. निवडणूक आयोगासमोर सुरु असणाऱ्या या प्रकरणाची सुनावणी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने घेण्याची मागणी शिंदे गटाने केली आहे. याचसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले की, मला काही सांगायचं कारण नाही. निवडणूक आयोग यासंदर्भात निकाल देईल,असं उत्तर दिलं. तसेच पुढे त्यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय जो काही असेल तो कुठल्याही राजकीय पक्षाला मान्य करावा लागेल, असंही सांगितलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *