कोळीवाड्याचे सर्वंकष असे विकास मॉडेल तयार करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ ऑक्टोबर २०२२

मुंबई


मुंबई शहर व उपनगर परिसरातील मूळ गावठाण आणि कोळीवाड्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, माजी आमदार किरण पावसकर उपस्थित होते.

या बैठकीत कोळीवाड्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास, आणि परंपरागत व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण तयार करावे लागेल. त्यासाठी आपल्या या कोळीवाड्याचे सर्वंकष असे विकास मॉडेल तयार करा असे निर्देश  यांनी दिले. मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांचे सिमांकन आणि विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) साठी स्थानिकांना विश्वासात घ्या. या दोन्हींसाठी स्वतंत्र समित्या करून, त्यामध्ये स्थानिक तसेच तज्ज्ञांचा समावेश करा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *