सेप्टिक टँक स्वच्छतेचे काम करणा-या ठेकेदारांना नोंदणी बंधनकारक

दि. ०३/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सेप्टिक टँक स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदारांना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत अनौपचारिकरित्या काम करताना, असुरक्षितरित्या काम करताना किंवा मैला उघड्यावर उत्सर्जित करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा सहायक आयुक्त विनोद जळक यांनी दिला आहे.

मलकुंड टाकीच्या क्षमतेनुसार, त्यात साचलेला मैला ३ वर्षांच्या नियमित कालावधीत महापालिकेने मान्यता दिलेल्या प्रतिनिधी संस्था / ठेकेदारांकडूनच उपसणी केली पाहिजे किंवा महापालिकेची मदत घेऊन विशिष्ट शुल्क भरून मैला उपसा करून घेणे अनिवार्य आहे. याकरीता निवासी इमारतीय र.रु.१५००/- (प्रति खेप) व व्यावसायिक इमारतीस र.रु.२५००/- (प्रति खेप) इतके सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे.

याकरीता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील खाजगी मलकुंड टाक्या (सेप्टिक टँक) उपसणे/स्वच्छतेसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या वाहनांचा वापर करता करावयाच्या झाल्यास मनपाच्या https://www.pcmcindia.gov.in/ > RESIDENTS> Citizens Facilitation Centre> CFC online application> Download forms> आरोग्य विभाग> सेप्टिक टँक उपसणे येथे नागरिकांनी अर्ज बनवून वरीलप्रमाणे शुल्क भरावे व जवळच्या नागरी सुविधा केंद्रात (Citizens Facilitation Centers) जाऊन अर्ज करावा आणि शहराच्या घनकचरा व्यवस्थापनास सहकार्य करावे.

तसेच मलमूत्र /सांडपाणी /मलकुंड स्वच्छ केल्यावर गोळा केलेला मलगाळ यांचा उत्सर्ग खाजगी गटारे/ मलवाहिनी याद्वारे पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, रस्ता, मोकळ्या जागा, जलसाठे, जलमार्ग, शेतजमीन अथवा अन्य अवांच्छित ठिकाणी उत्सर्जित केल्यास घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी सए जळक यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *