भोसरी विधानसभाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातुन तसेच कुंदन काळे यांच्या प्रयत्नांतून मंचर पी.एम पी एम एल बस सेवा सुरू…

आंबेगाव : –
मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ

घोडेगाव. ता. आंबेगाव येथील  सामाजिक कार्यकर्ते कुंदन काळे यांनी भोसरी ते मंचर या मार्गावर बस सेवा सूरु करणे बाबत , भोसरी विधानसभाचे कार्यक्षम आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या शिफासरसचे पत्र, स्वता जावून पूणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकाला दिले होते.


मंचर -जून्नर व आंबेगाव या भागातील, भोसरी येथे  दररोज  नोकरी निमित्त ये- जा करित असणाऱ्या अनेक महिला व विद्यार्थीची संख्या मोठया प्रमाणावर आहे. तसेच  खाजगी वाहनाद्वारे प्रवास जोखमीचे असून प्रवास करता वेळी अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे अशी कळकळीची  विनंती या शिफारस पत्राद्वारे दि. १६ डिसेंबर २०२० रोजी करण्यात आली होती.


अखेर पुणे महानगर परिवहन महामंडळाने भोसरी -मंचर या मार्गावर पी.एम.पी.एम एल बस सेवा सुरू केली आहे. पुढील अठवड्या पासून अनुक्रमीत डेपो व बस थांब्यावर प्रत्येकी ३० मिनिटाने बस उपलब्ध होणार आहे. दि. १६ जून रोजीच्या बैठकीमध्ये मार्ग कमिटीच्या मान्यतेनुसार नवे १० मार्ग सुरू झाले असून भोसरी -मंचर बस सेवा देखिल सूरू होणार आहे.