आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही; चंद्रकांत पाटलांचं पुण्यात वक्तव्य

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ ऑक्टोबर २०२२

पुणे


राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गुरुवारी पुण्यामध्ये सत्कार करण्यात आला. पुण्याच्या पालकमंत्री पदावर पाटील यांची निवड झाल्याने पुणे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाच्या भाषणात बोलताना चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत एक विधान केलं. मोदी आणि शाह यांना शिव्या घातलेल्या चंद्रकांत पाटलांना चालणार नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही असं एका नेत्याने आपल्याबद्दल शेतकरी संघटनेचे नेते असणाऱ्या राजू शेट्टी यांना सांगितल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की परवा आपल्या एका केंद्रीय नेत्याची आणि राजू शेट्टी यांची झाली. भेट झाल्यानंतर शेट्टी म्हणाले की दादांनी (चंद्रकांत पाटील) मला संपवलं. ते केंद्रीय नेते 40 वर्ष माझ्याशी जोडलेले असल्याने म्हणाले की दादा कोणाला संपवत नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल. ते म्हणतील जाऊ दे. आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण दादा मोदी आणि शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही. नशीब पाडला. बाकी काही करायचा त्याचा स्वभाव नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *